जत शहराची चिंता वाढली,पुन्हा 22 नवे रुग्ण

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात रवीवारी 33 नव्या रुग्णाची भर पडली.त्यात जत शहर 23,वळसंग 1,आवंढी 1,बेवणूर 4,वाळेखिंडी 2,बिळूर 2,येळवी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.जत शहरात एकदम पुन्हा 22 रुग्ण आढळून आल्याने मोठी चिंता वाढली आहे. 




जत शहरातील वाढलेली कोरोनाचे रुग्णामुळे शहराची परिस्थिती भहवाह झाली आहे.शहरातील रुग्ण संख्या 300 आसपास पोहचले आहेत.गेल्या आठवड्यात शहरातील रुग्ण संख्येत 100 ने वाढ झाली आहे.दरम्यान तालुक्यातील बाधित संख्या 917 पर्यत पोहचली आहे.सध्या 287 रुग्णावर उपचार सुरू आहेत.


शहरात कोविड सेंटर उभारण्याची गरज

Rate Card




जत शहरातील कोरोना बाधित वाढणारी संख्येच्या पार्श्वभूमीवर जत शहरात नवे कोविड सेंटर उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.पालकमंत्री जयंत पाटील यांनी घोषित केल्यानुसार न्याय भवन इमारतीत तातडीने कोविड सेंटर उभारावे.त्याशिवाय जत नगरपरिषदेनेही कोविड सेंटर उभारावे,अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.