जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कोरोना बाधित आकडा दिवसेन् दिवस वाढत आहे.रवीवारी पुन्हा तालुक्यात 36 रूग्णाची भर पडली आहे.तर एकाचा कोरोनाने मुत्यू झाला आहे.
तालुक्यात एकूण संख्या 715 वर पोहचली आहे. गेल्या आठवड्यात झपाट्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत.रवीवारी जत शहर 6,माडग्याळ 7,वाळेखिंडी 5,बेवनूर 5,बिळूर 2,संख 2,घाटगेवाडी 2,येळवी 1,शेगाव 1,नवाळवाडी 1,खोजानवाडी 1,कुंभारी 1 येथे रुग्ण आढळून आले आहेत.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपणच आपली काळजी घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यासाठी सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर,सँनिटायझरचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.








