भाजप नेते परशुराम चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह

0डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील भाजप नेते परशुराम चव्हाण सर व गर्व्हमेंट कँन्ट्रक्टर आप्पासाहेब तेली यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांनी सोशल मिडियावर याबाबतची माहिती दिली आहे.

डफळापूर येथील ते सहावे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.कोरोना काळात डफळापूर येथे कोरोना प्रभाव वाढू नये यासाठी 

चव्हाण सर यांनी कोरोना योध्दा म्हणून प्रभावी काम केले आहे.पदाधिकारी,व्यापारी,नागरिकांचा समन्वय साधत गाव बंद,औषध फवारणी,स्वच्छता याकडे त्यांनी गांर्भिर्यांनी लक्ष देत डफळापूरमध्ये कोरोनाचा फैलाव होणार नाही यांची दक्षता घेतली होती.अनावधाने कोरोना बाधिताशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांना कोरोनाची हलकी लक्षणे आढळून आली होती.मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये त्यांची कोरोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Rate Card

दरम्यान माझी तब्येत ठणठणीत आहे,हलकी लक्षणे आढळून आल्याने माझा व ठेकेदार आप्पासाहेब तेली यांची तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सध्या आम्हच्या दोघाचीही प्रकृत्ती ठणठणीत आहे.नागरिकांनी कोरोनाचा प्रभाव जीवघेणा आहे.त्यामुळे सोशल डिस्टसिंग, मास्क, सँनिटायझर वापर करावाच,असे आवाहनही परशुराम चव्हाण सर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.