जत,प्रतिनिधी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आपल्या नाव लौकीकाप्रमाणे काम करत नसून १०० टक्के वसूली असूनही सभासद असणाऱ्या शिक्षकांचे हित जपले जात नाही.सांगली जिल्हा विकास प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने व्याजदर कमी करून सभासदांचा हित जोपासला आहे.
तसाच निर्णय शिक्षक बँकेने घ्यावा अशी तमाम शिक्षक सभासदांची मागणी आहे. सलग दोन वेळा सत्ता भोगहूनही सत्ताधारी संचालक मंडळांनी तसा निर्णय घेत नसल्याचा व टाळाटाळ करत असल्याचा आरोप मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपकुमार हिंदूस्तानी (जत) यांनी केला आहे.
सांगली जिल्हा विकास प्राथ शिक्षक सहकारी पत संस्थेने शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षकांना अनोखी भेट दिली आहे. सर्वच प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात अर्धा टक्के ते 2 टक्क्यांपर्यंत घसघशीत कपात केली आहे.
संस्थेच्या दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या मासिक मिटिंग मध्ये शिक्षकांना शिक्षक दिनाची अनोखी भेट देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे.आकस्मिक व जामिनकी कर्जाच्या व्याजदरात घसघशीत सवलत दिल्याने सभासद वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आर्थिक कणा व आत्मा असलेल्या शिक्षक बँकेने असा महत्वाचा निर्णय घेऊन व्याजदरात सवलत देऊन शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी हिंदुस्थानी यांनी केली आहे.
शिवाय बँकेची वसुली करण्यासाठी इतर बँकाप्रमाणे संचालक, अथवा कर्मचाऱ्यांना मोठे कष्ट किंवा प्रयत्न पडत नाहीत.त्यामुळे बँकेने शिक्षकांच्या हितासाठी प्रयत्न करावेत.सातारा जिल्ह्यातील सोसायटीने ९ टक्के व्याजदर केले आहेत.त्याप्रमाणे सांगली जिल्हा शिक्षक बँकेने कर्जाचा व्याजदर ९ टक्के करावा.तसेच डिव्हिडंडची रक्कम ४ ते ५ टक्के ऐवजी १० टक्केपर्यत वाढवावी.शिक्षकांच्या साठी
असलेल्या बँकेने शिक्षकांच्या आर्थिक उन्नती होईल असे निर्णय घ्यावेत.
याशिवाय सध्याच्या बिकट परिस्थितीचा विचार करून बँकेतील सत्तारूढ संचालक मंडळाने सभासदांसाठी खालील मागण्याचाही विचार प्राधान्याने व्हावा Covid-19 या आजारामुळे सभासदांनाही आर्थिक फटका बसत आहे.
शिक्षक सभासदाना लागण झाली असल्यास बँकेने सभासदांना डिव्हिडंड मधील रक्कम आर्थिक मदत करावे. बँकेने सभासदांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी घरबांधणी कर्जाच्या व्याज दरात कपात करावे तसेच सर्व कर्जाचे व्याज दर 9 ते10 टक्के पर्यंत दिल्यास कोणत्याही प्रकारचे बँकेच्या नफ्यावर परिणाम होणार नाही याकरिता व्याज दर कमी करून सभासदांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी सभासदामधून होत आहे या मागण्यांचा विचार व्हावा अशी मागणीही हिंदुस्थानी यांनी केली आहे.











