मायलेकरांच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणाविरोधात गुन्हा दाखल | रेवनाळ येथील घटना ; संशयित चौघे ताब्यात

0





जत,प्रतिनिधी : रेवनाळ ता.जत येथील सोनाली प्रकाश गणाचारी,मुलगा प्रज्वल या मायलेकरास माहेरून पैसे आण म्हणून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती प्रकाश आप्पासाहेब गणाचारी,सासरे आप्पासाहेब गणाचारी,सासू सखूबाई आप्पासाहेब गणाचारी, दिर तानाजी आप्पासाहेब गणाचारी,अशोक आप्पासाहेब गणाचारी, जाऊ सारिका अशोक गणाचारी (सर्व रा.रेवनाळ,ता.जत)यांच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.





शुक्रवारी मध्यरात्री सोनाली हिने आपल्या दोन वर्षाच्या प्रज्वल या तान्हुल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती.रवीवारी सकाळी मयत सोनालीचे वडील दत्तात्रय तुकाराम खरात,रा.येळवी यांनी जत पोलीसात संशयिताविरोधात फिर्याद दिली आहे.







दरम्यान शनिवारी सोनालीचे वडील दत्तात्रय खरात यांनी पती प्रकाश, सासरे आप्पासाहेब, सासू सखूबाई,दिर तानाजी,अशोक,जाऊ सारिका यांनी लग्नात योग्य मानपान,हुंडा देऊनही मुलगी सोनालीला कामधंदा येत नाही व गाडी घेण्यासाठी एक लाख रूपये माहेरून आण म्हणून मारहाण करून,उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला.

Rate Card




त्या त्रासाला कंटाळून सोनालीने मुलगा प्रज्वलसह विहिरीत आत्महत्या केली आहे,असे फिर्यादीत म्हटले आहे.त्यावरून संशयित सहा जणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संशयित चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.





Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.