धनगर आरक्षणप्रश्नी तीन हजार सह्यांचे निवेदन
जत,प्रतिनिधी : धनगर समाजाच्या अनुसुचित जमाती आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तहसिल कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करून तीन हजार सह्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येत असताना धनगर आरक्षणा संबंधीची ग्वाही देण्यात आली आहे,तत्पुर्वी या सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आवाज उठवला होता.मात्र, सत्तेवर आल्यानंतर अनुषंगिक कार्यवाही केलेली नाही.
त्यामुळे तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर जतचे नायब तहसीलदार श्री.माळी यांनी तीन हजार सह्यांचे निवेदन स्वीकारले.
आरक्षणा संदर्भात राज्य शासनाने मंत्री समिती स्थापन करावी, तसेच राज्य आणि केंद्र शासनाशी समन्वय करणारी लोकप्रतिनिधी- अधिकाऱ्यांची समन्वय समिती गठित करावी. केंद्र शासनानेही अशीच स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी आमची मागणी आहे.
त्यादृष्टीकोनातून राज्य सरकारनेही पाठपुरावा करावा, या मागण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आल्याचे अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले.यावेळी अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे, जि प सदस्य सरदार पाटील,किसन टेंगले , रवींद्र कित्तुरे , विलास सरगर , ज्ञानदेव गलांडे ,नवनाथ मिसाळ,रखामजी मासाळ, प्रकाश मोटे ,गोरख पडोळे , बाळू मासाळ, रावसाहेब गणाचारी,संतोष गडदे, राजेंद्र खांडेकर आणि समाजबांधव उपस्थित होते.

जत : धनगर आरक्षणप्रश्नी तीन हजार सह्यांचे निवेदन देताना विवेक जागृत्ती अभियानाचे विक्रम ढोणे व कार्यकर्ते