जतमध्ये कामगारसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0
6



जत,प्रतिनिधी : जत मध्ये प्रथमच कामगार सेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे व शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख अजिंक्य पाटील यांच्या हस्ते साईनगर येथील परिवर्तन हाॅल येथे संपन्न झाले.




यावेळी महाराष्ट्र कामगार सेना राज्य प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे प्रमुख उपस्थितीत होते.रावसाहेब घेवरे म्हणाले,जत सारख्या दुष्काळी भागात जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.शिवसैनिक म्हणून न डगमगता समाजासाठी एकरूपतेने कसे काम करावे.जतच्या पाणीप्रश्न व अनेक मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन हे प्रश्न मांडू असे त्यांनी सांगितले.




अजिंक्य पाटील म्हणाले,जतच्या विविध प्रश्नांसाठी शिवसैनिकांनी संघटीत लढा उभारण्याची गरज आहे. 

अनिल शेटे,नागनाथ मोटे,राजेन्द्र आरळी,अमित उर्फ बंटी दुधाळ,सागर पाटील,शिवाजी पडोळकर,सुरेश घोडके,अशोक पाटील,रोहीत पाचंगे,आकाश भिसे,राजू सावंत,सहदेव  माळी,माणतेश ऐवळे,विठ्ठल ऐनापुरे पत्रकार उपस्थित होते.



जत: कामगार सेनेच्या कार्यालय उद्घाटन प्रंसगी उपस्थित मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here