पंचायत समितीचे गोडावून बनले कचरा डेपो

0जत,प्रतिनिधी : जेथून स्वच्छतेचा संदेश गावागावात दिला जातो.त्या पंचायत समितीच्या समोर असणारे गोडावून परिसर कचरा डेपो,अघोषित स्वच्छता गृह बनला आहे.जत पंचायत समितीचे साहित्य ठेवण्यासाठी पंचायत समिती कार्यालया समोर गोडावून बांधण्यात आले आहेत.गोडावून दुरूस्ती, गेट व लॉकची सुविधेसाठी लाखो रुपयाचा निधी काही वर्षापुर्वी उधळण्यात आला आहे. सध्या या गोडावून परिसर कचरा डेपो,अघोषित स्वच्छता गृह बनले आहे.त्याशिवाय या निर्जन जागेचा उपयोग अनैतिक संबधासाठीही होत असल्याचे समोर येत आहे.सध्या मागील बाजूला झाडीचे साम्राज्य पसरले आहे.त्या परिसरात काहीजणांचा संशयास्पद वावर असतो.तर समोरील बाजूला रस्त्याकडेच्या हॉटेल मालकांनी कचरा डेपो बनविला आहे.


Rate Card


चहाचे कप,उरलेले पदार्थ,चहाची पावडर टाकून घाणेघाण करत कचरा डेपो तयार केला आहे. ज्या पंचायत समितीकडून ग्रामपंचायती,नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला जातो.त्यांचा परिसरातच अस्वच्छतेचा कळस झाला आहे.विशेष म्हणजे काही लाखांना केलेले गेट कायम उघडे ठेवण्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.


जत पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये हॉटेल चालकांनी केलेला कचरा डेपो

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.