…अन्यथा मृत्तदेह घेऊन उपोषण करू | खा.संजयकाका पाटील यांचा इशारा

0सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर चालली आहे. लोक भयभीत झाले आहेत.रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.आठ – आठ तास रुग्णांना बेड,ऑक्सिजन मिळत नाही. ही स्थिती जर दोन दिवसांत सुधारली नाही तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे मृतदेह घेऊन आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणास बसू,असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सांगली जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शासकीय यंत्रणेला कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही.कोरोना काळात यंत्रणेकडून गतीने काम होत नाही. रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना आठ – आठ तास फिरावे लागत आहे.

खा.पाटील म्हणाले,मी स्व:ता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. 

Rate Card

कोरोना विरोधातील लढ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांना सामावून घेणे गरजेचे आहे.ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. त्याठिकाणी ऑक्सिजन,व्हेंटिलेटर उपलब्ध करणे आवश्यक आहे. मात्र हे न झाल्याने सांगली, मिरजेतील रुग्णालयांवर ताण येत आहे.मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.जनता भयभीत झाली आहे.ही परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. स्वयंसेवक म्हणून मी स्वतः शेकडो मुले घेऊन मदतकार्यात उतरतो. मुंबईतील कोरोना आटोक्यात येत आहे. त्यामुळे तेथील डॉक्टर, सिस्टर, ब्रदर व इतर स्टाफ बोलावून घ्या.येत्या दोन दिवसांत ही स्थिती सुधारली पाहिजे.अन्यथा कोणालाही त्रास न देता जे रुग्ण वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून मृत्युमुखी पडत आहेत.त्यांचे मृतदेह घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात बसू,असा इशाराही खा.संजयकाका पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.