प्रथम वर्ष डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेशासाठी मुदतवाढ

0जत,प्रतिनिधी : सिध्दार्थ पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी ता.4 संप्टेबर 2020 पर्यत मुदतवाढ दिली असल्याची माहिती,प्राचार्य दशरथ वाघमारे यांनी दिली.जत-शेगाव रोडवर असणारे सिध्दार्थ पॉलिटेक्निक हे डिप्लोमा,इंजीनियरिंग शिक्षणांची सोय असलेले जत तालुक्यातील प्रसिद्ध कॉलेज आहे.महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजीनियरिंग ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सिध्दार्थ पॉलिटेक्निकला अधिकृत सुविधा केंद्र (एफ.सी.6452) म्हणून मान्यता मिळाली आहे.

Rate Cardया सुविधा केंद्रावर डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेशामध्ये सहभागी होणेसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे,प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्राची पडताळणी करणे,व प्रवेश अर्जाची निश्चिती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या प्रवेश प्रक्रियेची अतिंम तारिखेला 4/9/2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जत तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी या संधीचा फायदा घेऊन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहनही प्राचार्य वाघमारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.