Epaper
जत,प्रतिनिधी : गंगा चरिटेब्ल ट्रस्टचे अध्यक्ष, विजयवाणीचे संपादक विजय नाईक यांचा वाढदिवस घरगुती साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सत्यनारायण पूजा व श्रीकृष्ण जन्माष्टमी ची पूजा करण्यात आली.
श्री बालाजी को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावतीने नाईक यांचा सोशल डिस्टसिंग पाळत सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गंगा चँरिटेबल ट्रस्ट,धनलक्ष्मी पतसंस्था,आरळी हॉस्पिटल व कर्मचारी यांनीही नाईक यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.
डॉ.रविंद्र आरळी,चंद्रकांत गुड्डोडगी,चन्नाप्पा मेडिदार, डॉ.राजेश पतंगे, यांच्यासह शहरातील सर्व डॉक्टरांनी सत्कार केला.
यावेळी मोहन मानेपाटिल, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, संचालक व पत्रकार राजू ऐवळे, जयवंत आदाटे, आबासाहेब ऐवले, जत शहर गॄहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत कुलकर्णी, किरण जाधव,दिनराज वाघमारे, मारुती मदने, राजू माळी, भागवत काटकर, जत फ्रेंडस ग्रुपचे श्रीकांत सोनवणे, विठ्ठल ऐनापुरे, प्रकाश जमदाडे, भीमराव राठोड सर, सदाशिव माळी आदी उपस्थित होते. त्याच बरोबर ज्ञात-अज्ञात मित्रमंडळी संघटनेचे पदाधिकारी,सामाजिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, शासकीय आधिकारी डॉक्टर्स यांनी शुभेच्छा दिल्या.
जत येथील गंगा चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय नाईक सांचा सत्कार करताना जेष्ठ स्ञीरोग तज्ञ डॉ.रविंद्र आरळी





