नगरसेवक भूपेंद्र कांबळेची अशीही कर्तव्यदक्षता

0जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे यांनी शहरात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जागृत्तीवर भर देताना शासकीय कार्यालये,सार्वजनिक चौकात कटआऊट लावून कोरोनाला आपल्याला हदपार करायचे असे असा जणू संदेशच या निमित्ताने दिला आहे.जत शहरात कोरोनाचा प्रभाव दिवसेन् दिवस वाढत आहे.यात प्रशासन काम करत आहेच.त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नगरसेवक भूपेंद्र कांबळे शहरात कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी दक्ष आहेत.कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या परिसरात स्व:ता औषध फवारणी करणे,त्याशिवाय नगरपरिषदेच्या विविध माध्यमातून बाधित रुग्ण व त्यांच्या कुंटुबियांना मदत करण्यात अग्रेसर आहे.नुकताच त्यांनी कोरोना बाबत नागरिकांत जागृत्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.


Rate Card

कोरोना पासून बचाव कसा करावा,कशी बाळगावी दक्षता,काय आहेत प्रशासनाचे नियम,अफवा रोका कोरोनाला हरवा या आशयाचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या फोटोसह शहरातील विविध ठिकाणी कटआऊटस् लावून जागृत्ती करत आहेत.शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय,मार्केट यार्ड,लोंखडी पुल,गांधी चौक,महाराणा प्रताप चौक,सोनलकर चौक या ठिकाणी कोरोना जागृत्तीचे सुनारे कटाऊट लावण्यात आले आहेत.या उपक्रमाचे शहरात स्वागत होत आहे.जत शहरात लावण्यात आलेले कोरोना जागृत्तीचे कटआऊट

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.