वीज बिले माफ करावीत ; संजय तेली

0जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत. नागरिक घरात असल्याने सर्वांची रोजी रोटी बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे,अशी मागणी युवक नेते संजय तेली यांनी केली.

राज्य सरकारने तात्काळ वीज बिले माफ करावी. अन्यथा राज्यभर विजबिले न भरण्याची मोहीम हाती घेवून सरकारशी असहकार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 
लॉकडाउनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच विज कंपन्यांकडून नागरीकांना अव्वाच्यासव्वा बिले आली आहेत.

Rate Card

 त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत, अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत. वीज कंपन्यांनी वीज बिले भरण्यासाठी तगादा लावल्याने आत्महत्या झाल्याचे घटनाही घडत आहेत. त्यामुळे सरकारने 300 युनिट पर्यंतच्या ग्राहकांची विजबिले तात्काळ माफ करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती तेली यांनी दिली. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.