आज मानव अज्ञानाच्या अंधारात चाचपडतो आहे. त्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. ‘मी’पणाच्या, अभिमानाच्या भावनेत गर्क होऊन भ्रष्ट होत चाली आहे. ‘मी’पणाच्या, अभमानाच्या भावनेत गर्क होऊन स्वार्थ आणि लालसेच्या अधाऱ्या दरीत आपला सारा जन्म माणूस आज लोटून देतो आहे. अंधाराचा विळखा (दिवसेंदिवस) बळकट होत चालला आहे. कारण ज्ञानाचा किरण दृष्टीला पडत नाही. महापुरुष समजावून सांगतात की, मावा, तुलाउजेड प्राप्त करायचा आहे.
प्रकाश मिळवायचा आहे ज्यायोगे तुझ्या आत्म्याची बंधने तुटतील. तुझे अंतरंग उज्ज्वल होईल आणि सारे भ्रम-संभ्रम लयाला जातील. तुझं-माझं ही भावना टाकून दे. भाषांचा फरक विसरुन जा, उच्च-नीच आणि जाती-पातीचे वादंग सोडून दे आणि केवळ माणसाचं नातं आपलंसं कर.‘मी’पणाची भाषा बोलण्याऐवजी ‘तू’ ‘तू’ची रागदारी छेडत जा.
जोपर्यंत ‘मी’पणाची भावना मानवाच्या मनात घर करुन बसली आहे तोवर भाषा, जातपात आणि संकुचितपणाचे संभ्रम त्याला चिकटून राहणार. पण ज्यावेळी तो ‘तू’च्या दिशेने पाऊल उचलेले त्यावेळी त्याला धनाची, जातिची किंवा अन्य कुठलीही उपाधी उरणार नाही. जस जशी तू तू च्या दिशेने त्याची वाटचाल होईल तस तसे निर्मळ आणि पवित्र भाव त्यांच्या अंतरी दृढ होतील, मनातून द्वेषभावनेची उचलबांगडी होईल आणि त्याचं जीवन सुखमयी होईल.
संत महापुरुषांनी या जगाला सदोदित एकच शिकवण दिली, एकच भावना मनी बिंबवण्याचा प्रयत्न केला की, हे मानवा, ज्या वस्तुंचा तुला एवढा अभिमान वाटतो, त्या एका दातार परमेश्वराच्या कृपेनेच तुला लाभल्या आहेत. मग तुला आपल्या तनाचा, मनाचा, धनाचा आणि विद्वत्तेचा (वृथा) अभिमान का? हे शरीर तुला लाभलं आहे, तुझ्या अंगी बळ आहे ही दातार ईश्वराचीच कृपा जाण. धन मिळालं आहे, ते तुझी गुजराण व्हावी म्हणून. प्रभुने तुला हे ऐश्वर्य दिले ओ ही त्याचीच कृपा. तुला बुद्धी लाभली, विद्वत्ता मिळाली ही सुद्धा दाताराचीच कृपा जाण. (पण नाही) तुला ही जाणीव नाही. मिळालेल्या ह्या दानांचा तू गैरवापर करतो आहेस. देह (बळाने) तू अन्य जनांवर जुलुम-अत्याचार करतोस, धनाच्या जोरावर दुसऱ्याची पिळवणूक करतोस आणि आपलं नुकसान झालं तरी बेहत्तर पण दुसऱ्याला हानी पोहोचावी असेच विार तुझ्या डोक्यात खेळत असतात. आपल्या सभोवती जीव गुदमरुनजाईल असं दूषित, गुढूळ वातावरण निर्माण करण्यासाठी ह्या ईश्वरीय दानांचा उपयोग करतो आहेस. ईश्वराने दिलेल्या ह्या दानांचा दुरुपयोग तू केवळ अज्ञानापोटी करीत आहेस. आपला जन्म अधारात घालवण्याचा हा परिणाम आहे.
************