काराजनगीत लांडग्याचा हल्ला | 9 मेंढ्या ठार,एक गंभीर | दोन लाखाचे नुकसान
जत,प्रतिनिधी : काराजनगी ता.जत येथील धनाजी विठोबा हाक्के मेढ्यांच्या कळपावर लांडग्याने हल्ला केल्याने 9 मेंढ्या ठार झाल्या,तर एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे.यात सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
धनाजी हाक्के यांचा येळवी रोडला जंगल वस्ती येथे मेंढ्या पालनाचा व्यवसाय आहे.
सोमवारी रात्री त्यांनी दररोजप्रमाणे घरालगतच्या मेंढ वाड्यात मेंढ्या कोंडल्या होत्या.मध्यरात्री सुमाराम लांडग्यांने मेंढ वाढ्याच्या कुंपनावरून आत प्रवेश करत मेंढ्यावर हल्ला केला,यात 9 मेंढ्याचा मुत्यू,तर एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे.

अचानक झालेल्या या घटनेने मेंढपाळ विठोबा हाक्केचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान या घटनेची माहिती युवा नेते विक्रम ढोणे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.वनपाल एस.एस.मुजावर,वनरक्षक सारिका दराडे यांनी पंचनामा केला आहे.
