जतेतील कंटेनमेंट झोन कमी करा | व्यापाऱ्यांची मागणी ; 18 ठिकाणच्या झोनचा फटका
जत,प्रतिनिधी : जत शहरात तब्बल 18 ठिकाणी कटेंनमेंट झोनचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे.यामुळे जवळपास जत बंद झाल्यात जमा आहे.
शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 47 वर पोहचली आहे. तर तीन जणांचा मुत्यू झाल्याने कोरोनाची दहशत कायम आहे.सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या चिंतेचा विषय बनली आहे.
शहरातील प्रमुख बाजार पेठ असलेल्या मंगळवारी पेठेत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने अर्धी बाजार पेठ बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील काही प्रमुख भागात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने त्या रुग्ण राहत असलेल्या परिसर लॉकडाऊन करण्यात आले आहेत.

दरम्यान लॉकडाऊनचे अंतर जास्त व्यापारी पेठ बंद ठेवाव्या लागत आहेत.यात दुकानदाराचे मोठे नुकसान होत आहे.
दुकान भाडे,कामगार खर्च,कर्जाचे व्याज असा तिहेरी फटका व्यापाऱ्यांना बसत असल्याने बाधित रुग्णाचे घर व जवळच्या इमारती वगळता अन्य ठिकाणी दुकाने उघडण्याची मूभा द्यावी अशी, मागणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे.
