जत,प्रतिनिधी : अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जत शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे. पूर्व,उत्तर, दक्षिण भागासह विस्तारित भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. रिक्त भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याला वातावरण पोषक आहे. त्यात औषधाची फवारणी व फॉगिंग बंद असल्याने डासांचा प्रकोप वाढत आहे.
शहरातील प्रमुख भागात डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मुख्य गाव भागात अशीच परिस्थिती आहे.दिवसेन दिवस डासांचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतानाही नगरपरिषद प्रशासनाने डासांना आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रभावी उपाययोजना हाती घेतलेली नाही.
त्रस्त नागरिक नगरसेवक अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करतात परंतु कोविंड नियंत्रण कामात व्यस्त असल्याचे सांगितले जाते.



