डोर्लीतील मृत्त व्यक्ती कोरोना बाधित | संपर्कातील सातजण अलगीकरणमध्ये ; तालुक्यात 2 नवे रुग्ण

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कोरोनाने आठवा बळी घेतला आहे.डोर्ली येथील मृत्त व्यक्तीचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे.रवीवारी नवे दोन रुग्ण वाढल्याने बाधित संख्या 199 झाली आहे.डोर्ली येथील इलेक्ट्रिक मिस्ञी असलेला मृत्त व्यक्ती भिलवडी येथे एका समारंभासाठी गेले होते.

तेथे ते पंधरा दिवस मुक्कामी होते.ता 5 ऑगष्ट रोजी ते डोर्लीला आले होते.दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास होऊ लागल्याने ढालगाव येथील खाजगी दवाखान्यात त्यांना दाखविण्यात आले,त्यांची प्रकृत्ती बिघडल्याने त्यांना मिरज कोविड सेंटर येथे हलविण्यात आले होते.मिरज कोविड सेंटर येथे उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी मुत्यू झाला.दरम्यान त्यांचा कोरोना चाचणी अहवाल रवीवारी आला आहे.दरम्यान डोर्लीत त्यांचा संपर्क आलेला नाही.दक्षता म्हणून मयत व्यक्तीच्या घरातील सात जणाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती,डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभीजीत चौथे यांनी दिली.

 

दरम्यान जत तालुक्यातील हा कोरोनाचा आठवा बळी ठरला आहे.जमेची बाजू म्हणजे आजपर्यत तालुक्यातील 130 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर कोरोनामुळे सहा जणांचा मुत्यू झाला आहे.सध्या कोरोना बाधित 63 जण विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.रवीवारी जत शहरातील कोरोनामुळे मुत्यू झालेल्याच्या संपर्कातील खाटीक गल्लीतील एक व्यापारी,बालगावमधील मृत्यू झालेल्याच्या संपर्कातील एका तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे.जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढत आहे.दरम्यान बाधिताच्या संपर्कातील नागरिकांची माहिती आरोग्य विभागाकडून गोळा करण्यात येत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.