जत,प्रतिनिधी : जत शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वव वाढला आहे.शहरात रुग्ण संख्या पन्नाशी कडे गेली आहे.त्यामुळे शहरातील प्रमुख व्यापारी पेठेसह प्रमुख भागात बाधित रुग्ण आढळून आल्याने तब्बल 10 ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने अर्ध शतकाजवळ आली आहे.शहरातील विविध भागात कोरोनाने आपला विळखा घातला आहे.कंटेनमेट झोनमुळे रस्ते बंद केल्याने शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व व्यापाऱ्यांनी देखील आपले व्यवसाय बंद ठेवल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. शहरातून जाणाऱ्या विजापूर -गुहागर रस्त्याने तुरळक वाहने दिसत होती.





