पवनचक्की जाळलली | सव्वा कोटीचे नुकसान ; महिन्यात दुसरी घटना

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जत ते वळसंग रोडवरील पवनचक्कीचे चोरीच्या उद्देशाने सुमारे सव्वा कोटीचे साहित्य जाळून नुकसान केल्याची तक्रार जत पोलीसात दाखल झाली आहे.पवनचक्की चाळून त्यातील तांबे,अँल्युमिनियन केबलसह किंमती साहित्य चोरी करण्याचा अज्ञाताचा इरादा असल्याचे स्पष्ट होत आहे.






Rate Card

तालुक्यात पुन्हा चोऱ्याचे सत्र जोरात सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.पवनचक्की जाळलल्या प्रकरणी आयनक्स विंड इनफ्रा सर्व्हिसेंस लिं,जत कंपनीचे अधिकारी उत्तम धोंडीबा थोरात रा.शिवाजी पेठ जत यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेली माहिती अशी,वळसंग-जत रोडवर आयनक्स विंड इनफ्रा सर्व्हिसेंस लिं,जत कंपनीच्या 26 पवनचक्क्या आहेत.त्यातील एमव्हीटी 83 पवनचक्कीचे गुरूवार(ता.6) ला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानी धान्याची पोती टाकून पेटवून दिल्याचे समोर आले आहे.





यात पवनचक्कीचे 1,33,21,954 रूपये किंमतीचे ऑपरेटिंग पँनल,कन्वटर,कैपर रिंग,कँपर केबल,अँल्युमिनीय केबल,185 ची सी यु केबल,सीसी यु किट,सेप्टी चैन केबल,सी यु बरेल लग्ज इत्यादी साहित्य जळून खाक झाले आहे.गेल्या महिन्याभरात पवनचक्की जाळण्याची ही दुसरी घटना आहे.सातत्याने पवनऊर्जा कंपनीचे नुकसान केले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.याबाबत आयनक्स विंड कंपनीच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडेही लेखी तक्रार केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.