कोळीगिरी-व्हसपेठ दरम्यान वाहनधारकांना लुटण्याचे प्रकार

0
3



माडग्याळ,वार्ताहर : जत पुर्व भागात वाहने अडवून लुटीच्या घटना वाढल्या आहेत.रवीवारी मध्यरात्री अशाच एका ट्रक टेलरच्या चालकांना अज्ञातून मारहाण करून मोबाईल,रोखड,व टोलरमधील सीझर लुटल्याचे समोर आले आहे.




वाहन चालकांने दिलेली माहिती अशी,कोल्हापूर ते उमदी असा प्रवास करत असनाना रात्री आकराच्या सुमारास कोळीगिरी-व्हसपेठच्या निर्जन रस्त्यावर एक पांढरी टाटा सुमो गाडीने ओव्हरटेक करून गाडी अडवी मारत माझ्या ट्रेलरला अडविले.त्यातून चार जण उतरत मला मारहाण करीत मोबाईल,रोखड,सीझर असे साहित्य लंपास केले.दरम्यान अशा रात्रीच्या सुमारास लुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत.काही तरूणांच्या टोळक्याकडून असे प्रकार होत असल्याची चर्चा आहे.या रस्त्यावर पोलीसांनी रात्रीची गस्त लावून अशा चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन धारकांतून होत आहे.



चोरट्यानी लुटलेला ट्रक,टेलर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here