संखमधील गुरूबसव विद्यामंदिरांची यशाची परंपरा कायम

0
1






संख,वार्ताहर : संख ता.जत येथील श्री.शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संचलित, श्री.गुरुबसव विद्यामंदिर व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शांलान्त परिक्षेत यशाची परपंरा कायम ठेवत शाळेचे नाव उज्वल केले.खडतर परिस्थितीशी संघर्ष करत, दहावीच्या परीक्षेत यशाची शिखरं गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार संस्थेचे संस्थापक तथा माजी सभापती डॉ.आर.के.पाटील व शाळेचे मुख्याध्यापिका सौ.कविता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.पाटील म्हणाले,

जिद्दीनं आणि मेहनतीनं यश मिळवणारी ही मुलंच खरे हिरो आहेत, खरे आयडॉल आहेत.





परिस्थितीशी झगडणाऱ्या या गुणवंतांची स्वप्नं साकार व्हावीत, त्यांच्या पंखांना बळ मिळावं, यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

विज्ञान, कला,मराठी माध्यम, कन्नड माध्यमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले.

शाळाचे निकाल विज्ञान विभागाचे 95 टक्के,कला विभागचे 85 टक्के निकाल लागला आहे.

विज्ञान विभाग प्रथम विजय मल्लिकार्जुन बिरादार (85.80),द्वितीय श्वेता विजयकुमार पाटील (79.38)तृतीय मयुरी रेवणसिध्दाप्पा तट्टीतेली (78.46) कला विभाग (कन्नड माध्यम)प्रथम किरण लावप्पा हविनाळ (76.76),द्वितीय विनोद हुसनाप्पा कांबळे (71.69),तृत्तीय ज्योती संतोष यमदे(70),कला मराठी माध्यम, प्रथम

रवी महादेव खोत (76.76),द्वितीय सुरेखा भारत नुलके(76.61), तृत्तीय शंकर हनुमंत टोणे (75.84)यांनी यश संपादन केले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मलिकार्जुन बागेळी,परिवेक्षक बी.जी.फुटाणे,किरण पाटील  सर,प्रा.एम.सी.बिरादार,संतोष पाटील सर, प्रा.सदाम सैय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.




संखमधील गुरूबसव विद्यामंदिरमधील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार करताना आर.के.पाटील 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here