ग्रामविकासाची दूरदृष्टी,कृतीशील व तडफदार नेतृत्व
आंवढीसह तालुक्याच्या विकासात युवा नेतृत्व म्हणून पुढे येत असलेले निश्चल,अविचल,लढाऊ आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून आज ज्यांच्याकडे पाहिले जाते असे माननीय आण्णासाहेब कोडग साहेब यांच्या 38 वाढदिवसानिमित्त प्रथमत: मी त्यांना शुभेच्छा देतो.
अगदी 38 वर्षात उद्योग व्यवसाय सोडून त्यांनी आंवढीच्या विकासाचे स्वप्न बघितले.पहिल्याच प्रयत्नात पहिले लोकनियुक्त संरपच बनले आहेत.अगदी कमी वयात थेट संरपच होण्याची किमया त्यांनी साधली आहे.त्यांच्या वर्षभरातील कारकिर्दीचा मागोवा घेतला,त्यांची ही विचारधारा प्रत्यक्ष कामातून ठळकपणे दिसून येते.संताच्या उक्तीप्रमाणे ‘बोले तैसा चाले’,हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसून आले आहेत.

आजघडीला भारतात आणि महाराष्ट्रात तरुणांची संख्या प्रचंड आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंट असे त्याचे यथोचित नाव आहे, पण ही जी तरुणाई आहे तिच्या आशा-आकांक्षा वेगळ्या आहेत, तिच्या विचारांची पद्धत वेगळी आहे.जर का गाव,तालुका,व राज्याला प्रगती करायची असेल तर या तरुणाईला समजून घेऊन आणि तिला योग्य दिशा देऊन काम करावे लागेल.
कोडग यांचा यंग फॅक्टर,अनुभव हा प्रभावी आणि तरुणाईला साजेसा व पुढे घेऊन जाणारा आहे.त्यांनी गेल्या दोन वर्षात आंवढी सारख्या गावात सिध्द करून दाखविले आहे.अखिल भारतीय संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते प्रभावी काम करत आहेत.
शंब्दाकन :
हणंमतराव बाबर,आंवढी