जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात रवीवारी पुन्हा दोन कोरोना बाधित आढळून आले.उटगीचे वैद्यकीय व्यवसाय करणारे खाजगी डॉक्टर,खैराव व बालगाव येथील एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जत शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याने संपर्कातील सुमारे 98 जणांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्यातील तीस जणाचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे.त्या तीस जण निगेटिव्ह आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी सांगितले.
जत तालुक्यात आतापर्यत बाधिताची संख्या 158 वर पोहचली आहे. तर उपचारा खालील संख्या 56 आहे.तर आजअखेर 89 जण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या जत कोविड सेंटर येथे 30, भारती व मिरज कोविड रुग्णालयात 26,बाधिताच्या संपर्कातील जत विलगीकरण मध्ये 14,गुड्डापूर विलगीकरण कक्षात 18 जणांना विलगीकरण करण्यात आले आहे.