अर्धे जत लॉकडाऊन | 24 कोरोना बाधित : आठ ठिकाणी कन्टेटमेंट झोन

0
2





जत,प्रतिनिधी : जत शहरात वाढलेल्या कोरोना बाधित संख्येमुळे आठ ठिकाणी कन्टेंटमेंट झोन केल्यामुळे अर्धे जत लॉकडाऊन झाले आहे.अगदी तालुक्याची मुख्य बाजार पेठ असलेली मंगळवार पेठही लॉकडाऊन झाली आहे.

शहरातील पारधीतांडा,विद्यानगर,मंगळवार पेठ,आंबेडकर नगर,लक्ष्मीनगर,विजापूर रोड,चिनगीबाबा मंदिर,मोरे कॉलनी,नदाफ गल्ली येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.बाधित रुग्णाच्या घरापासून 100 मीटर परिसर शासन नियमानुसार चौदा दिवसासाठी कन्टेंटमेट झोन(प्रतिबंधित क्षेत्र)घोषित करण्यात आले आहेत.

जत शहरात आतापर्यत 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जत शहरात गेल्या पंधवरड्यात पर्यंत रुग्ण संख्या आटोक्यात होती.मात्र गेल्या आठवड्यात शहरातील बाधित झपाट्याने वाढले आहेत.व्यापारी,डॉक्टर,अधिकारी कोरोना बाधित आढळल्याने शहरात चिंततेचे वातावरण पसरले आहे.

शहरातील मंगळवार पेठेत कोरोना बाधित आढळल्याने बनाळी चौक,ते महाराणा प्रताप चौकापर्यत मुख्य बाजार पेठ बंद करण्यात आली आहे. तर उमराणी रोड तांड्यात रुग्ण वाढल्याने तो परिसर पुर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर परिसरात बाधिताच्या संपर्कात आल्याने अन्य दोन रुग्ण वाढल्याने त्या परिसराला नगरपरिषेदेने बंद केले आहे.विजापूर रोडवरील बाधित व्यापाऱ्यांच्या संपर्क आल्याने कोरोना बाधित संख्या वाढल्याने तो परिसर सील केला आहे. विद्यानगर परिसरातील एका डॉक्टरांना व त्यांच्या दोन नातेवाईकांना कोरोनाची बाधा झाल्याने विद्यानगर मधील रुग्ण राहत असलेला परिसर काटेरी झुडपे टाकून बंद केला आहे. चिनगीबाबा मंदिर परिसर,नदाफ गल्ली,आंबेडकर ननगरमधील रुग्ण सापडलेल्या घरापासून शंभर मीटर पर्यतचा परिसर बंद करण्यात आला आहे. बाधित रुग्ण राहत असलेल्या परिसरात औषध फवारणी करून निंर्जूतीकरण करण्यात आले आहे. सर्वत्र आरोग्य विभाग व नगरपरिषदेकडून खबरदारी घेतली जात आहे.


 लॉकडाऊन नंतरही जत बंद


जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदनंतर जत शहर बाधित रुग्ण सापडल्याने अर्धे जत लॉकडाऊन करण्यात आले आहे. बंद नंतर सुरु झालेले शहर पुन्हा बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.


रुग्ण वाढण्याची भिती


शहरातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील अनेकजण सध्या संस्था क्वोरोंटाईन,होम क्वोरोंटाईन करण्यात आले आहेत. त्यातील अनेक रुग्ण वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.अनेकवेळा बाधित रुग्णाबाबत नातेवाईकांनी बेफीकीर पणा केल्यामुळे तेही पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहेत.



आरोग्य विभाग, प्रशासन सतर्क


जतेत वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, नगरपरिषद,महसूल प्रशासन सतर्क झाले आहे.बाधित रुग्ण सापडलेल्या परिसरातील संपर्क यादी,तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. नगरपरिषदे कडून परिसर सील करणे,निर्जूंतीकरण करण्यात येत आहे. महसूल यंत्रणा यावर नियत्रंण ठेवून कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.



जत शहरातील प्रमुख बाजार पेठेचे मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे.

 


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here