जत,प्रतिनिधी : जत शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या संभाजी चौक ते आरळी कार्नर पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे दोन दोन फुट खोल झाले आहेत.त्यातच पाणी साटत असल्याने अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे.
सांगली- जतला जोडणारा हा अर्धा किलोमीटरचा रस्ता नगरपरिषेदेच्या ताब्यात आहे. या रस्त्यावर दुभाजक व एलईडीमुळे नगरपरिषदेचा रस्ते कामाचा व खड्ड्याचा खेळखंडोबा सातत्याने उजेडात येऊनही याकडे पदाधिकारी,अधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे.अनेक वर्षापासून या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडत असूनही नगरपरिषदेचे दुर्लक्ष का होत आहे,असा गहन प्रश्न या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारक,नागरिकांना पडला आहे.रस्त्याचे काम अनेक वेळा करूनही खड्डे पाठ सोडत नाहीत हे विशेष…
गेल्या महिन्याभरातील पावसाने या अर्धा किलोमीटर रस्त्याची वाट लागली असून छोटे खड्डे मोठे डबके बनले आहेत.दुचाकी,लहान वाहनांचे यामुळे सातत्याने अपघात होत आहेत.नगरपरिषदेला नव्याने लाभलेले अनभुवी मुख्याधिकारी तरी या रस्त्याकडे लक्ष देणार का? खडड्यात एकादा नाहक जीव गेल्यावर नगरपरिषदेचे डोळे उघडणार अस संतप्त सवाल नागरिकातून व्यक्त होत आहे.
जत शहरातील प्रमुख असणाऱ्या संभाजी चौक ते आरळी कार्नर रस्त्यावरपडलेले जीवघेणे खड्डे