आंबडेकरनगर परिसरात औषध फवारणी

0
2





 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील आंबेडकर नगर मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येताच सभापती भूपेंद्र कांबळे यांनी नगरपरिषदेची यंत्रणेला बरोबर घेत संपूर्ण परिसरात औषध फवारणी करत निर्जूंतीकरण केला.

शहरातील आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या एका चालकास कोरोनाची लागण झाली आहे.



बाधिताचा अहवाल येताच या प्रभागाचे नगरसेवक तथा सभापती भूपेंद्र कांबळे यांनी बाधित रुग्णाच्या घराशेजारी परिसर बंद करत उपाय योजना सुरु केल्या.आरोग्य पथकांकडून नागरिकांची तपासणी बाधिताच्या संपर्कातील नागरिकांची शोध,नगरपरिषदेकडून औषध फवारणी करत कोरोना फैलाव होऊ नये,यासाठी खबरदारी घेतली आहे. 



परिसरात चौदा दिवसासाठी बाधित रुग्ण परिसरातील शंभर मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.या परिसरातील नागरिकांकडून स्व:तासह,कुंटुबियाची काळजी घ्यावी,कोणत्याही अडचणीसाठी नगरपरिषद किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे.


आंबेडकर नगर परिसरात औषध फवारणी करताना सभापती भूपेंद्र कांबळे व नगरपरिषदेचे कर्मचारी,कार्यकर्ते

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here