आरोग्य सेविकेस मारहाण,कसून चौकशी करा : निलम गोऱ्हे
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील येळवी येथील आरोग्य सेविकेस मारहाण झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार निलमताई गोऱ्हे या आक्रमक झाल्या आहेत.आ.गोऱ्हे यांनी कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांना पत्राद्वारे तपासाबाबत विविध मागण्या केल्या आहेत.त्यामध्ये तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांच्याकडून तपास काढून
घेण्यात कोविड-19 अन्वेय कठोर कारवाई करावी,अशा सुचना त्यांनी केल्या आहेत.येळवी येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका या
कोविड-19 चे कामकाज करत असतानाही गैरसमज करत धनाजी घोंगडे,बांळू घोंगडे रा.येळवी यांनी ग्रामपंचायती समोर बोलवून घेत चाबकाने मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.त्यांचा योग्य तपास होऊन संबधितावर कठोर कारवाई करावी.या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे झाला नाही.त्यामुळे चौकशी अधिकारी श्री. कांबळे यांना तात्काळ बदलावे,चौकशी अधिकारी म्हणून महिला अधिकारी यांना नेमावे,या गावांमध्ये सीसीटीव्ही लावलेले आहेत,ते सीसीटीव्ही तात्काळ ताब्यात घ्यावे.त्यामध्ये हा गुन्हा नोंद झालेला आहे.या गुन्हेगारांना पोलीस कोठडी व कठोर शिक्षा होण्याचे अनुषंगाने आवश्यक ते सर्व पुरावे तात्काळ जमा करण्याच्या सूचना चौकशी अधिकाऱ्यांना द्याव्यात,गुन्हेगारांनी वापरलेले चाबुक व मोटारसायकल पोलिस स्टेशनमध्ये जमा केले आहे ते व सीसीटीव्ही फुटेज तपासकामी वापरण्यात यावे.तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 1897 व दुरुस्ती अध्यादेश 2020 मधील आवश्यक कलमे लावावीत,असे गोऱ्हे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
