जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात हरिक्रांती आणणारी 1995 ची मुळ म्हैशाळ योजना पूर्ण करावी.पूर्वभागातील वंचित गावाकरिता विस्तारीत म्हैशाळ जत भाग योजनेला मान्यता द्यावी,अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केली आहे.तसे निवेदन त्यांनी खा.पाटील यांना दिले आहे.सद्यस्थितीत तुबची-बबलेश्वर (कर्नाटक राज्य) योजनेतून जत तालुक्यातील तिकोंडी व मोटेवाडी तलावात पाणी सोडावे अशीही मागणी जमदाडे यांनी केली.
निवेदनात म्हटले आहे की,जत तालुका हा कायम दुष्काळी आहे.आजही ऐन पावसाळ्यात 9 गावे 42 वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहेत.
आपल्या प्रयत्नामुळे तालुक्याच्या उत्तरेस येळवी,सनमडी तर दक्षिणेस बिळूर पर्यंत म्हैशाळ योजनेचे पाणी आले आहे.पूर्व भागात दरवर्षी पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष असते.अनियमित पाऊस यामुळे शेतीत हंगामी पिकेही व्यवस्थित येत नाहीत,अशी स्थिती आहे.6
मार्च 2019 रोजी पुर्व भागातील वंचित गावासाठी विस्तारीत म्हैशाळ योजना, जत भाग ही योजना आपण शासनास सादर केली आहे.पंरतू, अद्याप यावर्ती काहीही कार्यवाही झाली नाही.म्हैशाळ मुळ योजनेमुळे 22 हजार 500 हे.आर क्षेत्र ओलीताखाली येणें शक्य आहे.तसेच 16 लघुपाटबंधारे तलाव,संख दोड्डानाला मध्यम प्रकल्प भरून देणेची या योजनेत तरतूद आहे.2003 साली गुड्डापूर साठवण तलावास प्रशासकीय मान्यता देताना म्हैशाळ योजनेच्या पाण्याने हा तलाव भरण्यात येणार आहे,असे पाटबंधारे कार्यालयाकडून सांगणेत आले होते.म्हैशाळ योजनेचा 83 कि.मी.चा मुळ कालवा या तलावापर्यंत होता पंरतू 81
कि.मी.जवळ हा कालवा मायथळ येथूनच गुड्डापूरकडे न वळविता मंगळवेढ्याकडे वळविण्यात आला आहे. यामुळे माडग्याळ,सोन्याळ,उटगी, कुलाळवाडी,अंकलगी,व्हसपेठ,गुड्
व्हसपेठपर्यंत कँनॉल काढल्यास कमी खर्चात पाणी सुमारे 12 गावांना पाणी देणे शक्य आहे.विस्तारीत योजनेची कार्यवाही होईपर्यंत मायथळ ते व्हसपेठ पर्यंत कॅनॉल काढल्यास दहा ते बारा गावात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै महिना संपत आला तरी,गतवर्षी पेक्षा पर्जन्यमान अत्यल्प आहे.त्यामुळे शेती संपुष्टात येण्याची भिती व्यक्त होत आहे. सध्या कर्नाटक शासनाच्या कागवाडपासून अलमट्टी पर्यंत असणाऱ्या सर्व उपसा सिंचन योजना सुरू आहेत.यातील अनेक योजनेतून जतच्या पूर्व भागातील हद्दी पर्यंत पाणी आले आहे सध्या हे पाणी समुद्रहट्टी व टक्कलगी (जिल्हा विजयपूर)येथे सोडण्यात येत आहे.तेच पाणी पुढे नैसर्गिक सायफन पद्धतीने जत तालुक्यात सोडल्यास कागनरी,मोठेवाडी, पांडोझरी,भिवर्गी तलावापर्यंत पोहोचू शकते.तसेच टक्कलगी तून पाणी सोडल्यास यत्नाळ,तिकोंडी,भिवर्गी जाऊन करजगी,बेळोंडगी,बालगाव, सुसलाद,कर्नाटक हद्दीत बोर नदीपात्रातून पाणी जाऊ शकते.यापूर्वी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाला अतिरिक्त टीएमसी पाणी दिले आहे.आता कर्नाटकातून महाराष्ट्राला पाणी घेण्याची गरज आहे.त्यासाठी आपण केंद्र, महाराष्ट्र कर्नाटक सरकारकडे पाठपुरवा करून कायम दुष्काळी जतचा कंलक पुसावा,असेही जमदाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
जत पुर्व भागाला तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी द्यावे,या मागणीचे निवेदन खा.संजयकाका पाटील यांना देताना केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे
Attachments area