चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून | सांगलीतील घटना : संशयित मुळ जतच्या शिंगणापूरचा

0

अहमदनगर: चारित्र्याच्या संशयावरून ...

कुपवाड : कुपवाड शहरातील कुपवाड-मिरज रस्त्यालगत असलेल्या वाघमोडेनगर येथे राहणाऱ्या पतीने पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून खून केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.अर्चना रामचंद्र हाक्के (वय 28, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती रामचंद्र विठोबा हाक्के (35, मूळ गाव : शिंगणापूर, ता. जत  सध्या रा. वाघमोडेनगर, कुपवाड) याला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,मुळ शिंगणारचा असलेला संंशयित रामचंद्र हाक्के हा गेल्या दोन वर्षांपासून वाघमोडेनगर मधील यशवंत गडदे यांच्या खोलीत पत्नी अर्चना व 3 लहान मुलासह भाड्याने राहत होता.तेथे खाजगी कामाला होता.या पती पत्नीत घरगुती व किरकोळ कारणावरून सातत्याने वादावादी होत असे.वादावादीमुुुळे पती रामचंद्र हा आपल्या मूळ गावी शिंगणापूर येथे काही दिवसापूर्वी गेला होता तर पत्नी अर्चनाने मुलांना घेऊन सलगरे (ता. मिरज) येते नातेवाईकाकडे राहत होती.

Rate Card

सोमवारी (दि. 27) हाक्के यांनी पत्नीची समजूत काढून कुटुंबासह मंगळवारी सायंकाळी कुपवाड येथे घरी रहायला आला होता.बुधवारी रात्री हाक्के कुटुंबीय जेवण करून झोपले होते. हाक्के रात्री 11.30 च्या दरम्यान टॉवेल मध्ये गुंडाळून ठेवलेल्या दगडाने अर्चनाच्या डोक्यात घाव घातल्याने ती रक्तबंबाळ होऊन निपचित पडली होती.आईला अशा अवस्थेत बघून मुलांनी आरडाओरड केला.शेजाऱ्यांनी रामचंद्रला दरवाजा उघडा अशा हाका मारल्या मात्र रामचंद्रने दरवाजा उघडला नाही त्यामुळे शेजाऱ्यांनी कुपवाड पोलिसांनी  ही माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हाक्के याला दरवाजा उघडण्यास सांगितले.दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी खोलीत पाहिले असता अर्चना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तिला जखमी अवस्थेत सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी रामचंद्र याला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.