1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध दराबाबत आंदोलन | दूधसंघांनी सहकार्य करण्याचे आवाहन
जत,प्रतिनिधी : राज्यात पाणी महाग आणि दूध स्वस्त: अशी विदारक परिस्थिती आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून जिल्ह्यातील दूध संघांनी शनिवारी दूध संकलन बंद करून सहकार्य करावे. तर शेतकऱ्यांने दूध न घालता मोफत वाटावे असे,आव्हान रासपचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले, सध्या गायीचे दूध पंधरा ते अठरा रुपये आहे तर बिसलेरी पाण्याची एक लिटर बाटली वीस रुपये आहे.याचाच अर्थ राज्यात पाणी महाग दूध स्वस्त हे वास्तव आहे.त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.ग्रामीण महाराष्ट्रातील अर्थकारण दूध व्यवसायावर अवलंबून आहे. कोटयावधी छोटे मोठे शेतकरी दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहेत.मात्र दूध दर कमी झाल्याने संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे दूध दरात वाढ होणे गरजेचे आहे.
राज्यात मोठया प्रमाणात तरुण दुग्ध व्यवसाय उतरला असून दूध दर कमी झाल्याने उत्पादना पेक्षा कमी दर दुधाला मिळत आहे. त्यामुळे पदरमोड करून पशुधन जोपासवे लागत आहे. घरखर्च, आठवडा बाजार चालेना झाल्याने अश्या कोरोना सारख्या महामारी मध्ये दुग्ध व्यवसायक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. म्हणून राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री तथा रासपचे संस्थापक अध्यक्ष आ. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी एक दिवस राज्यव्यापी दूध संपुर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे दूध संघांनी शनिवारी दूध संकलन न करता आंदोलनास सहकार्य करावे. त्याच बरोबर गावागावातील दूध डेअरी व दुध संस्थानीही संकलन करू नये. तसेच शेतकऱ्यांनीही दूध न घालता मोफत वाटप करून आंदोलनास सहकार्य करावे. जिल्ह्यात आंदोलन यशस्वी करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उमाजी चव्हाण, लोकसभा अध्यक्ष महेश मासाळ, आटपाडीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर, जतचे तालुकाध्यक्ष किसन टेंगले, वाळवा तालुकाध्यक्ष धनाजी गावडे, कवठेमहांकाळचे तालुकाध्यक्ष दादा कोळेकर, तासगांवचे तालुकाध्यक्ष विजय जाधव, खानापूरचे तालुकाध्यक्ष प्रशांत खुपकर, शिराळाचे तालुकाध्यक्ष संदीप गावडे, राजेंद्र साठे, सचिन सरगर, भूषण काळगी, अकिल नगारजी, दादा जानकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.