जतेत एकाच दिवसात 12 कोरोना बाधित | शहरातील संख्या 25 वर
जत,प्रतिनिधी : जत शहरात कोरोनाची साखळी झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. जत शहरात गुरूवारी एकाच दिवसात शहरात तब्बल 12 कोरोना बाधित आढळून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जत शहरातील पांरधी ताड्यातील मयत 70 वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.तर शहरातील कोरोना बाधित डॉक्टरांच्या संपर्कातील दोघाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर अन्य दोघे कोरोना बाधित आढळून आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.शहरातील संख्या आता 25 वर पोहचली आहे. दरम्यान बाधिताच्या संपर्कातील लोंकाचा शोध आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.