जत,प्रतिनिधी :जत पूर्व भागातील बालगांव,हळ्ळी,करजगी,बेळोंडगी,संख सोनलगी,सुसलाद या गावाच्या बोर नदीसह तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील ओढापात्रे,तलावात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची संख्या झपाट्याने वाढत आहे.अशा वाळू तस्करीने तालुका व्यापला असून महसूलचे अधिकारीच या तस्करांना उभय देत असल्याने याला रोकणार कोन असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये वाळू तस्करी दुप्पट झाली आहे.अगदी दिवसा ढवळ्या वाळूचे ट्रक शहरातून नेहले जात आहेत.
या वाळू तस्करीत अनेकजण उतरले असल्याने शासनाचा महसूल बुडवून निसर्गाला ओरबडणारे वाळू तस्कर दुचाकी गाडी वरून आता वातानुकूलीत चारचाकी गाडीतून फिरताना दिसत आहे.कमी कष्टात कमी भांडवलात जास्त पैसै मिळवून देणाऱ्या या काळ्या सोन्याला मागणी जास्त वाढत आहे.यातून मिळणाऱ्या अमाप पैशातुन गुंडा गर्दी वाढत आहे.त्यामुळे ते शेतकरी,शासकीय अधिकारी यांच्या वर देखील हात उचण्यास मागे पुढे बघत नाही, अशा परिस्थितीत जर ओढ्या शेजारील शेतकरी विरोध करत असल्यास त्यांना धमकविण्याचा प्रंसगी मारहाण करण्यापर्यत वाळू तस्कराचे मजल गेली आहे.
अशा घटना पुढील काळात घडु नये यासाठी महसुल अधिकारी,कर्मचारी व पोलीस प्रशासन याकडे वेळीच लक्ष देवून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.अनेक वेळा ट्रॅक्टर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जातात. पण हे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यातून लवकर बाहेर काढण्यासाठी महसूल प्रशासनातील काही अधिकारी या वाळू तस्कराचे टँक्टर बाहेर काढून देण्यासाठी इमानइतबारे काम करत आहेत. त्यात त्याच्या अर्थपुर्ण सहयोग ठरलेला असतोच. कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन पाटील यांनी अशा कर्मचारी वर्गावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
अवैध वाळू तस्करी सुरु असल्याची माहिती गौण खनिज तस्करी विरोधी पथकाला मिळाल्यावर ते या ठिकाणी पोहचायच्या आधीच या वाळू माफियांना टीप मिळत असल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. याचा पुरेपूर फायदा हे वाळू माफियां उचलत आहेत. अनेक वेळा गौण खनिज तस्करी विरोधी पथकातील अधिकारी छापा टाकण्यासाठी गेले असताना त्यांच्या सोबत पोलीस बंदोबस्त नसल्याने या पथकावर देखील हल्ले झाले आहेत.यातील थोड्याच आरोपींवर कारवाई झाली आहे.अशाने वाळू तस्कर एखाद्या शेतकऱ्याचा जीव घेतल्या शिवाय मागे हटणार नसल्याचे देखील चर्चा आता परिसरातील नागरिकातून होत आहे.पुढील काळात तरी अशा घटना घडू नये यासाठी वाळू माफियांवर दंडात्मक कायद्या अन्वय कारवाई बरोबरच फौजदारी गुन्हा दाखल करून मटका बहाद्दरा प्रमाणे यांची देखील तडिपारची कारवाई करावी अशी मागणी जोर घरत आहे.