जत शहरातील कोठावळे प्लॉट,पार्वतीनगर परिसर,वळसंगमध्ये कंटेनमेंट झोन

0
2

सांगली : जत तालुक्यातील जत शहरातील कोठावळे प्लॉट परिसर, पार्वती नगर परिसर  व वळसंग  येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली.



कंटेनमेंट झोन जत शहरामधील कोठावळे प्लॉट येथील परिसर –  मौजे जत शहरामधील कोठावळे प्लॉट येथील परिसराचे उत्तरेकडील चडचण रस्त्यालगत संजय गुरव यांचे दुकान गाळ्यापर्यंत, पूर्वेकडील काशीबाई धानाप्पा काठावळे यांचे प्लॉटपर्यंत, दक्षिणेकडे विजापूर गुहागर रस्त्यापर्यंत, पश्चिमंकडे बसवेश्वर चौकापर्यंत या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटंेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन –  मौजे जत शहरामधील कोठावळे प्लॉट येथील परिसराचे उत्तरेकडील मार्केट यार्डाचे बाजूचे कंम्पाउन्डपर्यत, पूर्वेकडे शहाजी शंकर कोळी यांचे घरापर्यंत, दक्षिणेकडील मल्लाप्पा शंकर माळी यांचे घरापर्यंत, 



पश्चिमेकडील विजापूर गुहागर रस्त्यालगत मोगली कॉम्पलेक्सपर्यंत.

 कंटेनमेंट झोन कंटेनमेंट झोन जत शहरामधील पार्वती नगर येथील परिसर – जत शहरामधील पार्वती नगर येथील परिसराचे उत्तरेस प्रताप चौकापर्यंत, पूर्वेकडे राममंदीर पर्यंत, दक्षिणेकडे विजय जाधव यांचे प्लॉटपर्यंत, पश्चिमेकडील दिलीप तुराई जमानीपर्यंत. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटंेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे  बफर झोन – जत शहरामधील पार्वती नगर येथील परिसराचे उत्तरेकडे जत सांगली रस्त्यालगत संभाजी पवार यांचे घरापर्यंत,  पूर्वेकडे जत बिळूर इर्शाद हॉटेलपर्यंत, दक्षिणेकडे बाल विद्या मंदीर शाळेपर्यंत, पश्चिमेकडील मदन बोर्गीकर यांंचे घरापर्यंत.

कंटेनमेंट झोन वळसंग येथील सुतार गल्ली परिसर – उत्तरेस सुखदेव यादव यांचे घरापर्यंत, पूर्वेस सोमनाथ महानिगिया स्वामी यांचे मोकळे जागेपर्यंत, दक्षिणेस बाळकृष्ण सुतार यांचे मोकळे जागेपर्यंत, पश्चिमेस पुनित शिंदे यांचे घरापर्यंत.



 या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन – उत्तरेस बंडगर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत साहेबसिंग रामसिंग धडेकर यांचे जमीनी पर्यंत, पूर्वेस कल्लाप्पा भिमाण्णा गुरव यांचे जमीनीपर्यंत, दक्षिणेस सालेकीरी हद्दीतील उमेश भगवान जाधव यांचे जमीनीपर्यंत, पश्चिमेस भिमराव रामू भोसले यांचे जमीनीपर्यंत.सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here