पुस्तक परिचय – सामान्यातील असामान्य

0

   “स्वतः साठी तर सगळेच जगतात, दुसऱ्यांसाठी जगणे  हेच खरे आयुष्य आहे”, असा विश्वास बाळगून जगताना आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या समाजातील अनंत अडचणींवर मात करून स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या,”सामान्यातील असामान्य “लोकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारे हे पुस्तक म्हणजे सर्व वाचकांसाठी एक ऊर्जा व प्रेरणादायी स्रोत आहे. किशोरवयीन, तरुण व प्रौढ अशा तिन्ही पिढीनं प्रेरणा देणारे “सामान्यातील असामान्य”हे पुस्तक लिहिणारे लेखक श्री. मछिंद्र ऐनापुरे हे स्वतः च युवकांसाठी एक प्रेरणा आहेत.         


              
      महाराष्ट्रातील युवकांना उद्योग व्यवसायाचे वावडे आहे, युवकांमध्ये चांगले काही करून दाखवण्याची धमक निर्माण झाली पाहिजे. एकाग्रता, जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य, झपाटलेपणा या गुणांच्या बळावर मुलांना आपले आवडीचे क्षेत्र निवडून स्वतः चा विकास करण्यास आणि उंच भरारी घेण्यास हातभार मिळेल असे लेखक प्रस्तावनेत सांगतात.आवडीच्या क्षेत्रात काम करण्यास संधी मिळाली तर युवा पिढी मोठी भरारी घेऊ शकतात. एक चांगला भला माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकतात, असा विश्वास लेखक ऐनापुरे यांना वाटतो. या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिचित्र प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने असामान्य कामगिरी केलेली आहे. अनंत अडचणींवर मात करून आपले कुटुंब, गाव, समाज यासाठी धडपडणारी व नवनिर्मितीचा ध्यास घेणारी हि प्रत्येक व्यक्तिरेखा वाचकाला खिळवून ठेवणे. काहीतरी नवीन शिकवून जाते. मग ती गावाचे गंदा हे नाव बदलणारी  छोटी हरप्रीत असो कि जंगलात शौचालय बांधण्यासाठी धडपडणारी संघर्ष रागिणी पी.जी. सुधा असो. माणसाने मनात आणले तर  अशक्यही शक्य करण्याची ताकद सामान्य माणसाकडे असते. हेच या व्यक्तींचे अनुभव आपल्याला सांगतात.



प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या एखाद्या व्यक्तीने केलेली प्रत्येक गोष्ट लोकांना प्रेरणा देणारी भासवले जाते. परंतु असे काही रिअल हिरो हि असतात ज्यांनी खरोखर असामान्य असे कार्य करून दाखविलेले असते. आणि  त्याचा फायदा समाजात सर्वांना झालेला असतो. तरीही या रिअल हिरोच्या कामाचा उल्लेख फारसा कोठेही आढळत नाही. त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्याचे काम प्रस्तुत पुस्तकात लेखकाने केलेले आहे.या पुस्तक रूपाने सामान्य माणसांची असामान्य कामगिरी वाचकांच्या  घरा घरात आणि मनामनात पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम लेखकाने केलेले आहे. एरवी तेरवी लहान सहान गोष्टींनी खचून जाणाऱ्या आणि स्वतःचे  जीवन संपविण्यात वेळ वाया घालणाऱ्या युवा पिढीच्या डोळ्यात या व्यक्तिचत्राच्या रूपाने झणझणीत  अंजन घालण्याचे काम लेखकाने केलेले आहे.


Rate Card


    कॅन्सर वर मात करणारी उद्योजिका कनिका ,लेडी टारझन ,जमुना ,टुटू, देवदासी प्रथे विरूद्ध लढणारी सिताव्वा , मानवी तस्करी विरूद्ध लढणाऱ्या रमादेवी अशा देशातील कानाकोपऱ्यातील अगदी दुर्लक्षित भागातील व्यक्तींच्या संघर्षमय जीवनाची कहानी वाचकांपर्यत पोहोचविण्याचे महान कार्य लेखकाने या पुस्तक रुपाने केलेले आहे.महाराष्ट्र पाठ्यपुस्तक संशोधन मंडळाने श्री.ऐनापुरे यांच्या लेखन कार्याची दखल घेऊन ,”धाडसी कँप्टन राधीका मेनन” या व्यक्तिचित्राचा समावेश 2018 च्या आठवीच्या बालभारती अभ्यासक्रमात केलेला आहे.त्यातुन किशोरवयीन मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.सर्वांनी आवर्जून वाचावे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक “सामान्यातील असामान्य” लिहिणारे लेखक श्री.मच्छिंद्र ऐनापुरे यांचे व्यक्तीमत्व ही सामान्यातील असामान्य असेच आहे.सांगली जिल्ह्यातील ‘जत’ सारख्या दुर्गम भागात जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणारे श्री.ऐनापुरे एक सिद्धहस्त लेखकही आहेत. लेखन वाचनाचा छंद जोपासणारे मुक्त पत्रकार आपल्या लेखनीद्वारे प्रेरणादायी लिखान करतात. त्यांचे विविध विषयांवरील अनेक  ब्लाँग असून एक समृद्ध असा ज्ञान व माहितीचा साठा त्यावर उपलब्ध आहे. त्यांच्या अनेक बालकथा महाराष्ट्रातील सर्वच आघाडिच्या वृत्तपत्रातून तसेच किशोर सारख्या  बालमासिकांमधूनही प्रसिद्ध आहैत.त्यांचे  “जंगल एक्सप्रेस”, “गोष्टी स्मार्ट चमूंच्या” सारखे नाविन्यपूर्ण बालकथा संग्रह ही प्रसिद्ध आहेत. machindraainapure.blogspot.com हा त्यांचा ब्लाॉग ही प्रसिद्ध आहे.त्यावर अनेक विषयांवरील विपुल असे वाचनीय खाद्य उपलब्ध आहे.


    लहान मुलांसाठी लिखान करणं हे सर्वात अवघड काम असते..परंतु प्राथमिक पदविधर असलेले श्री.ऐनापुरे मुलांच्या विश्वास सहज मिसळून त्यांच्या साठी प्रेरणादायी लिखान करु शकतात हे त्यांनी अनेकदा सिद्धही केले आहे.
     सामान्यातील असामान्य पुस्तकाच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठावरील  सर्व व्यक्तीचिंत्राँचे प्रसन्न चेहरे चित्रित असून वाचकाला आकर्षित करतात.चोखंदळ वाचकांच्या ग्रंथसंपदेत या पुस्तकरुपाने आणखी एका मोलाच्या पुस्तकाची भर पडेल..या पुस्तकाची प्रथम आवृत्ती  1जुलै 2018 ला प्रकाशीत झाली होति. लवकरच  दुसरी आवृत्ती ही  प्रकाशीत होणार आहे ,या वरुनच या पुस्तकाची प्रसिद्धी व महत्त्व समजते. सर्व वयोगटातील स्री पुरुषांनी आवर्जून वाचावे असे या पुस्तकाचा आस्वाद सर्वांनि घ्यावा..व आपल्या विद्यार्थ्यांना ही वाचण्यास द्यावे.

            मनिषा चौधरी ,नाशिक
            9359960429
 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.