जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वायफळ येथील सौ.शालन दादासो सावंत (वय 32,रा.वायफळ)या विवाहित महिलेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,शालन सावंत या पती व दोन मुलासह वायफळ येथील सांवत वस्ती येथे राहत होत्या.त्यांची शेतीही तेथेच आहे.त्याच्या लगतच्या नातेवाईकांनी मक्याची लागवड केली होती.मक्याच्या पिकांचा भटके कुत्री,जनावरापासून बचावासाठी कंपाऊंड मारून त्या कंपाऊंडच्या तारेला विजेचा प्रवाह सोडलेला होता.
दरम्यान मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शालन सावंत यांचा हात या विज प्रवाहाला लागला.त्यात त्यांना विजेचा जोराचा झटका लागून त्या कंपाऊंडच्या तारेवर पडल्याने त्यांचा जागेवर मुत्यू झाला आहे.दरम्यान मोटार बंद करायला गेलेली पत्नी घरी आल्या नाहीत म्हणून, दादासो सावंत यांनी शेतात धाव घेतली.पत्नी पडल्याचे पाहून त्यांनी पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनाही विजेचा धक्का बसला,सुदैवाने ते बचावले.मात्र विना परवाना विजेचा प्रवाह चालू केल्याने एका महिलाचा नाहक जीव घेण्यारा ठरला आहे.मयत शालन सांवत यांच्या पाठीमागेे दोन मुली असून त्यांच्या आई नियतीने हिराऊन घेतली आहे.या घटनेने परिसर हळहळ व्यक्त होत आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.