जिल्ह्यात कोरोनाचे 6 बळी | जतेतील महिलेचा समावेश ; दिवसभरात नवे 121 रूग्ण

0

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी सहा जणांचा मुत्यू झाला.मिरज तालुक्यातील बेडग मधील एक,पद्याळे एक सांगली शहर एक,मिरज शहर 2,जत शहरातील एक महिलेचा मृतामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात तब्बल 121 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.




त्यात मिरज 41,सांगली 56,आटपाडी 5,जत 6,खानापूर 1,मिरज 6,पलूस 2,वाळवा 1,तासगावमध्ये तिघेजण कोरोना बाधित आढळून आले आहे.तर दिवसभरात 81 जण कोरोना मुक्त झाले आहेत.जिल्ह्यात 833 एँक्टिव्ह रुग्ण संख्या आहे,तर 1762 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर आजपर्यत 57 जणांचा मृत्यु झाला आहे.




दरम्यान जत शहरात कोरोनाचा प्रभाव दिवसेन् दिवस वाढत असताना बाधित महिलेवर उपचार सुरू असताना मुत्यू झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.जत शहरातील मोरे कॉलनीतील महिलेचा कोरोनामुळे सोमवारी मुत्यू झाला आहे.त्याचबरोबर सोमवारी शहरातील डांळिब व्यापाऱ्यांच्या संपर्कातील तिघे,मुंचडीचे मुंबईहून आलेले तिघे अशा नव्या सहा कोरोना बाधिताची भर पडली आहे.जतची बाधित संख्या 221 वर पोहचली आहे.

Rate Card




17 जूलैरोजी शहरातील मोरे कॉलनीतील राहणाऱ्या एका शिक्षिकांच्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.सदर महिलेला प्रकृत्ती बिघल्याने त्यांना मिरज येथे दाखल करण्यात आले होते.त्यावेळी घेण्यात आलेल्या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.तेव्हापासून त्यांच्यावर मिरज कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.



अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मावळली.दरम्यान मयत महिलेला कर्नाटकातील जमखंडी येथून  कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.त्यांच्या संपर्कातून शेगाव येथील एक युवतीही बाधित आढळून आली आहे.मयत महिला जत दुय्यम निंबधक कार्यालयाजवळ राहत होत्या.त्यामुळे हे कार्यालय 14 दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे.शहरातील कोरोना बाधित संख्या वाढत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.