जिल्हाधिकारी यांच्या अवाहनाला खासगी वैद्यकीय व्यवसायीकांचा प्रतिसाद

0

सांगली : कोरोनाचे संकट मोठे आहे. या साथीच्या नियंत्रणासाठी समाजाला आपली गरज असून त्यासाठी शासनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, अशा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केलेल्या अवाहनाला खासगी वैद्यकीय व्यसायीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 




सांगली जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेदिवस वाढत असून त्यासाठी शासकीय रुग्णालयांसोबतच आवश्यकतेनुसार महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सुचीबध्द असलेली रुग्णालये, तसेच बाँम्बे नर्सिंग ॲक्ट खाली नोंदणीकृत असलेली खासगी रुग्णालये कोविड -19 उपचारासाठी अधिग्रहित करण्यात येत आहेत. आतापर्यंत वॉनलेस हॉस्पीटल मिरज, घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल सांगली ,विवेकानंद हॉस्पीटल बामणोली, सेवासदन हॉस्पिटल मिरज, मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया, सांगली, कुल्लोळी हॉस्पिटल विश्रामबाग, सांगली ही रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत.





Rate Card

 या ठिकाणी या रुग्णालयांच्या पॅनेलवरील वैद्यकीय व्यवसायीक व अन्य कर्मचारी यांच्या बरोबरच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्याचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे. या संदर्भात संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी नियोजन सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत खासगी वैद्यकीय व्यवसायीकांनी प्रशासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितिन कापडनीस, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 





या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोविड -19 च्या रुग्णांवर उपचार सेवा बजावणाऱ्यांना डॉक्टरांना संबधित रुग्णालये संरक्षण सामग्री उपलब्ध करुन देणार आहेत. तसेच शासनाने दिलेले विमा संरक्षण लागू राहिल. सेवा बजावताना एकाद्याला प्रादुर्भाव झाल्यास त्यांना उत्कृष्ट दर्जाची उपचाराची सुविधा देण्यात येईल. असेही सांगितले. 



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.