डफळापूर,वार्ताहर :अंकले ता.जत येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील त्यांची आई व बाज येथील उपचार केलेल्या बोगस डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.दरम्यान डफळापूरच्या डॉक्टरचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याने डफळापूरला धोका काय आहे.
अंकले येथील 40 वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोना बाधित आढळून आला होता.त्याआधी त्यांच्यावर बाज येथील एका बोगस डॉक्टरकडे उपचार केले होते.त्याचा अहवाही पॉझिटिव्ह आल्याने बाजमध्ये खळबळ उडाली आहे.त्यामुळे बाज हायरिस्कवर आले आहे.बाजमधील या बोगस डॉक्टराकडे उपचार केलेल्या रुग्णांची संख्या तूफान आहे.त्याचे कोणतेही रेकार्ड नसल्याने बाजला प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान बाधित रुग्णांवर उपचार केलेल्या डफळापूर येथील डॉक्टरांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर डॉक्टर व त्यांच्या कंपाऊडरचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याने डफळापूर अजूनही सलाईन आहे.डॉक्टराच्या रिपोर्टकडे आता डफळापूर करांचे लक्ष लागले आहे.