संख,वार्ताहर : तिल्याळ ता.जत येथील एका 22 वर्षी महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली.
रुग्ण सापडताच संखचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत बुरूकुले,आरोग्य विभागाचे कर्मचारी,सरपंच सुरेश कटरे,ग्रामसेवक शिंगे,यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसर सील केला.
बाधित महिला सासरहुन 12/06/2020 रोजी माहेर असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बावची जात असताना चकर व अशक्तपणा वाटत असल्यामुळे माडग्याळ येथे महिलेला एका खाजगी दवाखान्यात दाखल झाले होते.त्यानंतर पुन्हा जत येथील खाजगी दवाखान्यात दाखवले असता रक्त कमी असल्यामुळे, पुढील उपचारासाठी सांगली भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार सुरू असताना तिला जास्त त्रास होत असल्यामुळे मिरज शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. दि.21 जुलै रोजी महिलेचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.दि. 22 जुलैला तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.तिच्यावर उपचार केलेला माडग्याळ येथील खाजगी दवाखाना सील करण्यात आला आहे.
तिल्याळ येथील पतीचे (सासर)घर गावापासून तिन किलोमीटर अंतरावर आहे,तथील परिसर सील करण्यात आला आहे.त्या महिलेच्या घरातील आई,वडील,दिर अशी तीन जणाचे स्वाब तपासणीसाठी घेणार असल्याचे डॉ.बुरकूले यांनी सांगितले.घटनास्थळी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे.