पुण्याहून जतेत आलेला तरूण कोरोना पाझिटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत शहरात पुण्याहुन आलेल्या एका तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.शहरातील हा पाचवा कोरोना बाधित रुग्ण आहे.
शहरात पुण्याहून आलेल्या हा तरूण शहरातील चिगनी बादशाह मंदिरापाठिमागे राहत होता.

त्या तरूणांला त्रास होऊ लागल्याने कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असता,त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात आतापर्यत शेगाव रोडवरील दोघे,मोरे कॉलनीतील एक महिला,मार्केट यार्डातील विजापूर रोडला राहणारा एक व्यापारी असे पाचजण कोरोना बाधित आढळून आले आहेत.शहरात हळूहळू कोरोना पाय पसरत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान रूग्ण
सापडलेल्या परिसरात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे.संपर्कातील लोंकाचा शोध सुरू आहे.