बालगाव,वार्ताहर : बालगाव (ता.जत) येथे उमदी जिल्हा परिषद गटाचे भाजप युवा नेते संजय तेली यांनी जिल्हा परिषद गटामध्ये स्व:खर्चातून पाच हजार मास्कचे वाटप करण्यात आले.मतदार संघातील प्रत्येक गावात प्रत्येकाला पोहचतील इतके मास्क वाटप करण्यात आले.
दलित पँथरची राज्यभर पुर्नबांधणी करणार ; भूपेंद्र कांबळे | सभासद नोंदणी सुरू |
संजयकुमार तेली म्हणाले की,सध्या येथील जिल्हा परिषद सदस्य पद रिक्त आहे.सध्या या मतदार संघाची जबाबदारी माजी सभापती तम्मणगौंडा पाटील यांच्याकडे आहे.त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या निधीतून आशा वर्कर,आरोग्य कर्मचारी यांना सँनिटाझर,मास्क,हँडग्लोजचे वाटप करण्यात आले आहे. आता या भागात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे.त्या पार्श्वभमीवर कोरोनाच प्रभाव रोकण्यासाठी या मास्कचा प्रत्येक नागरिकांना उपयोग होणार आहे. या मास्कचा प्रत्येक नागरिकांना वापर करावा,असेही यावेळी तेली यांनी आवाहन केले.उमदी,हळ्ळी,बालगाव,बोर्गी आदी गावात मास्क वाटप करण्यात आले.
जबरदस्तीने काम केल्यास बेमुदत उपोषण | सांगोला-जत महामार्ग ; स्वा.शेतकरी संघटनेचा इशारा |
यावेळी बालगाव येथे ग्रामपंचायत सरपंच रमेश बगली,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब तेलसंग,रामचंद्र कांबळे अप्पाशा कोळी,आणि प्रल्हाद लोणी, मळसिध्दय स्वामी,शिवानंद पाटील, सुरेश बडची,संपत गुरव,संतोष अवजी,मलकारी माने,मळसिध्द कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
बालगाव ता.जत येथे मास्कचे वाटप करताना संजय तेली