बिळूरकरांनी अखेर जिंकली लढाई | गाव कोरोना मुक्त : आरोग्य, महसूल,ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाला यश

0


जत,श्रीकृष्ण पाटील : जत तालुक्यातील बिळूर येथील कोरोनाची साखळी रोखण्यामध्ये प्रशासन यशस्वी झाले आहे.सतर्क आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या हायरिस्क लोकांना संस्थात्मक काॅरंटाईन केल्यानेच बिळूर येथील कोरोनाचे संकट दूर करण्यात बिळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.प्रमोद कांबळे व आरोग्य कर्मचारी यांच्या प्रयत्नाना यश आले आहे.मात्र अजूनही कंटेन्टमेंट झोन कायम आहे.दक्षता म्हणून अजूनही दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.






जत तालुक्यातील द्राक्षबागायत दारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिळूर येथील एका 42 वर्षीय इस्त्री व्यवसाईक व्यक्ती कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आल्याने त्याला मिरज येथिल एका मोठ्या खासगी हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते.त्या ठिकाणी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले होते.उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सबंधित व्यक्ती ही कोठेही बाहेर गावी न जाता त्याला कोरोना कसा झाला याचा शोध प्रशासनाने सुरू करत असताना 

प्रशासनाला सुद्धा या बाबत काही ठोस माहिती मिळत नव्हती. त्यानंतर या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील त्याच्या घरातील लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले त्यामध्ये त्या व्यक्तीच्या पत्नीला व मुलाला कोरोना झाल्याचे आढळून आले. 







दरम्यान ही व्यक्ती बिळूर येथील ज्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी अडमीट होती.त्या दवाखान्यातील एका कंपाउडरला कोरोनाने गाठले होते. त्यातच बिळूर येथील कोरोना बाधित रूग्णांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने तेथे कोरोनाचा समुह संसर्ग झाल्याचे समोर आले.संपर्कातील कोरोनाची संख्या 69 पर्यंत पोहचली.त्या संपर्कातील सुमारे 1185 लोंकाना संस्था, होम कोरोंटाईन करण्यात आले होते.

दरम्यान बिळूरला जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरिगोसावी, उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,तहसिलदार सचिन पाटील, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे,तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर, यांनी बिळूर येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली होती.







जिल्हा प्रशासनाने बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्रमोद कांबळे यांच्यावर बिळूर येथील कोरोनासंदर्भात योग्य ती दक्षता व खबरदारी घेऊन आवश्यक त्या उपाययोजना बाबत सुचना दिल्या होत्या. 

त्यानुसार येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ. कांबळे यांनी आपल्या आरोग्य कर्मचारी, आशावर्कर्स यांना सोबत घेऊन वेगवेगळी सात पथके तयार केली.कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण ज्या परिसरात आढळून आला त्या परिसरातील सर्व ताप,खोकला,सर्दीचे लक्षणे असलेल्या सर्व रुग्णाचे थर्मल स्कॅनिंग व त्यांचे ऑक्सीजन तपासणी करत निदान केले. हे करित असताना ज्या व्यक्ती तंदुरुस्त दिसत होत्या.ज्यांना कोणत्याही प्रकारे त्रास जाणवत नव्हता,अशा व्यक्तींचे ऑक्सीजन लेवल शंभरच्या खाली असेल अशा व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम केले.नंतर यातील हायरिस्क व्यक्तींना जत येथिल कोविड सेंटर मध्ये संस्थात्मक काॅरंटाईन केले.मोठ्या अडचणीतून वैद्यकीय अधिकारी कांबळे व कर्मचाऱ्यांनी ऑक्सीजन पातळी कमी असलेले रूग्ण शोधत कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रयत्न केले.अनेक नागरिक आरोग्य विभागाचे वाहनामध्ये बसण्यास तयार नव्हते परंतु या प्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन त्यांना वाहनातून जत येथिल कोविड सेंटर मध्ये संस्थात्मक काॅरंटाईन केले होते. 

Rate Card







संस्था कोरोंटाईनमधील रूग्णांचे कोरोना तपासणी साठी स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये बहुतांशी लोकांचे स्वॅब हे कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले.बिळूर येथील जे कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण सापडले आहेत.त्यामध्ये बिळूर येथील एक द्राक्षे छाटणी करणे व डाळींबाची कलमे बांधणे या व्यक्तीचा व एक सिंधी विकणारी महीला या दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रसार झाल्याचे स्पष्ट झाले.सबंधित व्यक्ती ह्या डाळींबाची कलमे बांधणे करिता व सिंधी विक्री व्यवसायासाठी सिमावर्ती भागातील कर्नाटक राज्यात जाऊन आल्यानेच या व्यक्तीपासूनच बिळूर येथे कोरोनाचे पाॅझीटीव्ह रूग्ण सापडून बिळूर गाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाल्याचे समोर आले होते.  








प्रशासनाने बिळूर येथे कोरोनाचे पार्श्वभूमीवर जत नगरपरिषदेच्या अग्णीशामक गाडीच्या मदतीने संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण केले होते. तसेच संपूर्ण गाव कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.

बिळूर मधील कोरोनाचे संकट दूर होण्याबाबत प्रशासन चिंतेत होते. परंतु येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्रमोद कांबळे व त्यांचे आरोग्य कर्मचारी व आशावर्कर्स यानी खूप परिश्रम घेत कोरोनाचा प्रभाव संपविण्यात यशस्वी झाले आहेत.बिळूर येथे गेल्या पंधरवड्यात कोरोनाचा एकही पाॅझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. त्याचे संपूर्ण श्रेय हे बिळूर येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ.प्रमोद कांबळे, त्यांचे आरोग्य कर्मचारी,तसेच बिळूरच्या ग्रामस्थानी ही कोरोनाचे काळात आप आपल्या घरी राहून प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सुचना व आदेशाचे चांगले प्रकारे पालन केले आहे.परिणामी गाव कोरोना मुक्त झाले आहे.








जतचे उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर व प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डाॅ.निलेश पालवे यांच्यासह बिळूर पंचायत समितीचे सदस्य रामाण्णा जीवाण्णावर,बिळूर ग्रा.पं.चे सरपंच नागणगौडा पाटील,उपसरपंच महादेव धोडमणी, ग्रामसेवक आनंदा राठोड, मंडल अधिकारी संदिप मोरे,पोलीस पाटील,दिलीप खोत,तलाठी कोरोना काळात प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य करणारे ग्रामस्थ आदिंच्या प्रसत्नाला यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.