लॉकडाऊनच्या आठ दिवसात महामार्गाचे काम करा | विजापूर-गुहागर महामार्ग : जतच्या नागरिकांची मागणी

0
1




जत,प्रतिनिधी : अनेक महिन्यापासून वेदनादायी ठरलेल्या विजापूर-गुहागर महामार्गाचे जत शहरातील काम जिल्ह्यात केलेल्या आठ दिवसाच्या काळात गतीने करावे,असे आवाहन शहरातील नागरिकांनी केले आहे.

जत शहरात गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील महामार्गाचे काम रखडले आहे.मुळे 24 मीटरचा मार्ग किती मीटरचा करायचा किती मीटरचा,पाणी योजनेची पाईपलाईन,व नगरपरिषद,स्थानिक राजकारण यामुळे गेल्या काही दिवसापासून काम रखडविल्याचे आरोप आहेत.





माजी आमदार विलासराव जगताप,विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांनी वारंवार बैठका घेत संबंधित ठेकेदार,विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देऊनही शहरातील चडचडण रोड ते शेगाव चौकातील काम रखडले आहे.गेल्या पंधरवड्यात पडलेल्या पडलेल्या पावसाने या मार्गावर पाच पाच फुटापर्यत खड्डे पडले आहेत.पुर्ण रस्ताचा खड्ड्याचा बनला असल्याने पावसाचे पाणी साठून वाहनधारकासह नागरिकांचे बेहाल सुरू आहेत.चालताही येत नाही अशी अवस्था रस्त्याची झाली आहे.संतप्त नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदारांच्या नावाने लाखोली वाहण्यात येत आहे.





वीवारी पुन्हा आमदार विक्रमसिंह सांवत यांनी बैठक घेत या मार्गाचे काम तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानंतर तात्काळ यंत्रणेकडून हालचाली करण्यात आल्या.सोमवारी मोजणी करून मार्गाकडेच्या अतिक्रमावर मार्किंग करण्यात आले आहे.सोमवारी दिवसभरात काही अतिक्रम धारकांकडून स्व:ता अतिक्रमण काढून घेण्यात येत होती.

दरम्यान मोठी वाहतूक वर्दळ असल्याने कामात अडचणी येण्याच्या शक्यता आहेत.त्यामुळे पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या ता.22 ते 30 जूलैपर्यतच्या लॉकडाऊन मध्ये सर्व बंद असल्याने या काळात मार्गाचे काम करावे,जेणेकरून कोणत्याही अडचणीचा ठेकेदारांच्या यंत्रणेला अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here