सांगली जिल्ह्यात 22 ते 30 जुलै पर्यंत लॉकडाऊन : पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा
सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव रोकण्यासाठी महानगरपालिक,नगरपालिका, नगरपंचायत हद्दीत 22 ते 30 जुलै पर्यंत लॉकडाऊनची पालकमंत्री जयंतराव पाटील यांची घोषणा केली.
या काळात लोकांना बाहेर किंवा बाहेरील लोकांना या ठिकाणी येता येणार नाही.
त्याशिवाय ग्रामीण भागात जनता कर्यूं
राहणार असून लोकांनी स्वयंशिस्त
पाळावी,असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खासदार, आमदार आणि प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय घेण्यात आला.
22 जुलै सायंकाळी 10 वाजल्यापासून लॉकडाउनची अंमलबजावणी होणार आहे.30 जुलै पर्यंत हे लॉकडाउन राहणार आहे.