जत,प्रतिनिधी : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून जत पुर्व भागात पाणी सोडण्याचा निर्णय अतिंम टप्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकातील प्रमुख नेते व जलसंपदा अधिकाऱ्यांची सांगलीत महत्वपुर्ण बैठक झाली.तिथे दोन्ही बाजूच्या समस्या,अडचणीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी,वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील,खासदार संजयकाका पाटील,आमदार विक्रमसिंह सांवत,सांगली बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील आदी उपस्थित होते.
सांगली येथे बैठकीसाठी उपस्थित असलेल्या कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांचे स्वागत करताना आमदार विक्रमसिंह सांवत,मंत्री श्रींमत पाटील,खा.संजय पाटील,संतोष पाटील