बाधिताच्या संपर्कातील 28 जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत शहरासह धावडवाडी,निगडी खुर्द,गुंलगुजनाळ येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 28 जणाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांचे सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जत शहरातील मोरे कॉलनीतील वृध्द महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबंळ उडाली होती.बाधित महिला राहत असलेल्या ठिकाणीच दुय्यम निंबधक कार्यालय असल्याने धोका व्यक्त होत होता.
शुक्रवारी जत शहरासह निगडी खुर्द,गुलगुंजनाळ व धावडवाडी येथील नऊ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते.त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांची स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान सुदैवाने बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे,असे तालुका वैद्यकीय अधिकरी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.