वळसंग,वार्ताहर : तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणे हा योग्य निर्णय आहे.या निर्णयामुळे युवकासह अनेकांना अनुभवाची संधी मिळेल,अशी माहिती युवक कॉग्रेसचे नेते गणी मुल्ला यांनी दिली.
गणी मुल्ला पुढे म्हणाले,कोरोनाच्या भयावह संकट संपुर्ण देशासह जगावर घोघावंत आहे.जत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मुदती संपत आहेत.या अनुषंगाने शासन अशा मुदत बाह्य ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा विचार करत आहे. प्रशासक नेमल्याने खुंटलेला विकासाची गाडी तूर्तास का होईना पण मार्गस्थ होईल अशी आशा आहे. पण या शासन निर्णयाला भाजपकडून पायदळी तुडवत विरोध केला जात आहेत.
ग्रामपंचायत विभागात भाजप काळात आरक्षण आणि लोकनियुक्त सरपंच प्रणालीमुळे अनेक गावांचा विकास खुंटला आहे.आताच्या शासनाचा प्रशासक नेमण्याचा निर्णय योग्यच आहे,कारण यामुळे युवा चेहरे शिकतील, आणि जनसामान्य यांची कामे करणारी समाजसेवी चेहरे यात संधीप्रिय असू शकतात. कर्तव्य आणि निष्ठा राखून गावासाठी या काळात घेतले जाणार निर्णय जनहिताचे असतील.हेच चेहरे प्रत्यक्षात भविष्यात ग्रामपंचायत स्तरावर उत्तम कामगिरी करू शकतात.त्यामुळे या निर्णयात शासनाने बदल न करता लागू करावा, विरोधी पक्ष म्हणून काम करणाऱ्या भाजपने या निर्णयाचे स्वागत करावे,असे आवाहनही मुल्ला यांनी केले.