सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 4 बळी | 64 नवे रुग्ण | जतेतील बाधिताच्या संपर्कातील सर्वाचे अहवाल निगेटिव्ह

0

जत,प्रतिनिधी : सांगली शहरातील 1, मिरज शहरातील 2 आणि मिरज तालुक्यातील बेळंकी येथील 34 वर्षाच्या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला.जिल्हातील मुत्यूची संख्या 33 झाली आहे.दरम्यान जत शहरासह धावडवाडी, गुलगुंजनाळ,निगडीखुर्द येथील बाधिताच्या संपर्कातील 28 नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.जिल्ह्यात दिवसभरात 63 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रातील 40 जणांचा समावेश आहे.सांगली शहर- 25 व मिरज शहर-15 जणांचा समावेश आहे.जिल्ह्यातील आजचे कोरोना रुग्ण : आटपाडी तालुका – नेलकरंजे 1, कवठेमहांकाळ तालुका – आरेवाडी 1,आगळगाव 1,कडेगाव तालुका – कडेगाव शहर 1, खानापूर तालूका – खानापूर 6,मादळमुठी 1,मिरज तालुका – कवठेपिरान 3,भोसे 2, शिराळा तालुका – शिराळा 1,कुंभारवाडी 2,तासगाव तालुका – तासगाव शहर 1, सावळज 1,वाळवा तालुका – शिगाव 1, वाटेगाव 1,अँक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 545 वर पोहचली आहे. एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 1035,आतापर्यंत 435 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.

Rate Card


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.