संख,वार्ताहर : जत तालुक्यातील उमदी व गुलगुंजनाळ येथील दोन डॉक्टरांसह चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान धावडवाडी येथील दोघे,निगडी खुर्द येथील दोघे अशा आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गुलगुंजनाळ येथील कोरोना बाधितावर उपचार केलेले डॉक्टर व अन्य एकजण,तर उमदी येथील कोरोना बाधितावर उपचार केलेले एक डॉक्टर व अन्य एकजणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जत धावडवाडी येथे पुण्याहून आलेले दोघे व निगडी खुर्द येथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील दोघे जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
यामुळे जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 105 वर गेली आहे.नागरिकांनी मास्कचा वापर,सोशल डिस्टसिंगचा वापर करावा,असे आवाहन अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांनी केली आहे.